phone९५९५३ ८३९१६, HH ९५२७६९८३९३ Devider Emailहेल्पिंगहॅन्डसकोप@जीमेल.कॉम
नोंदणी क्रमांक

महाराष्ट्र २३२/२०१०/ अ. नगर

देणगी देण्यासंबधी
अधिक माहिती

लढणार्‍यांना परिस्थिती रस्ता मोकळा करुन देते...

अधिक माहिती

Banner

संस्थेबद्दल माहिती

Hr Line

संस्था स्थापनेची पार्श्वभूमी सन २००६ मध्ये ऑगस्ट महिन्यात् मला मु.पो. उमरखेड जि. यवतमाळ येथून श्री. किशोर सारडा यांचे पत्र मिळाले. त्यात् त्यांनी आपल्या २७ डिसेंबर २०१२ चा दै. सकाळ मधील “प्रयत्ने वाळूचे कण…” या सदराखालील लेख वाचल्याचे व ते लेख कमीत-कमी २०० ते ३०० लोकांना झेरॅाक्स करून वाचण्यास दिल्याचे कळविले व सदर लेख वाचून त्यांच्या मुलींना ही प्रेरणा मिळाल्याचे कळविले. त्यांना योग्य ते मार्गदर्शन देउन ही गोष्ट मी विसरूनही गेलो. परंतु सन २००९ मध्ये जुलै महिन्यात् त्यांचे परत एक पत्र मिळाले व त्यांनी खालीलप्रमाणे मजकूर नमूद केलेला होता.

“ सर बर्‍याच कालावधीनंतर तुम्हाला पत्र देत् आहे. माझी मुलगी कु. नेहा ही ८९% गुण घेवुन विज्ञान शाखेत पुसद तालुक्यामध्येे पहिली आलेली आहे. मी दैनिक ठेव प्रतीनिधी म्हणुन काम करीत् आहे. उत्पन्न कमी असल्याने कुठलीही बँक मला मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज देत् नाही व खुल्या प्रवर्गात मोडत् असल्याने इतर कुठल्याही सवलती किंवा स्कॅालरशिपही मिळणार नाही. आपल्या ओळखीच्या काही धर्मदाय संस्था ज्या उच्च शिक्षणासाठी मदत करतात अशा काही संस्थांची नावे कळविल्यास मी त्या संस्थांकडे मदतीसाठी अर्ज करू शकेल ”

मी त्यांना काही संस्थांची नावे व पत्ते कळविली. परंतु नंतर दोन ते तीन महिन्यांनी त्यांचे परत पत्र आले की, सर कोठूनही मदत् मिळाली नाही. नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेवुन व काही माझ्या बचतीचे पैसे टाकून मुलीला डॅा. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र संस्था, लोणेरे जि. रायगड येथे प्रथम वर्ष - अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आहे. शैक्षणिक खर्चासाठी तुमच्या पातळीवर काही करता येते का ते बघावे. त्यांचे पत्र मिळाले त्याच दिवशी माझ्या ऑफीसमध्ये काही कामानिमित्त माझे मित्र व करदाते श्री. दिपकशेठ लोढा हे बसलेले होते.

पुढे या घटनेने मला बरेच अंतर्मुख केले. एका मुलीला आपण मदत् केली परंतु समाजामध्ये अजूनही बरेच गरजू , वंचित् व होतकरू मुले व मुली आहेत्. ज्यांच्या उच्च शिक्षणासाठी आपणाला मदत् करता येईल. व्यक्तिगत त्यांना मी हे पत्र दाखवले व त्यांना विनंती केली की आपण दोघे मिळून काही मदत् करू. त्यांनी त्यांच्या खिशातील रू. ५०००॑ काढून दिले. मी श्री. किशोर सारडा यांना फोन करून त्यांच्याकडून बँक खाते नंबर मागवून घेतला व माझे रू. ६००० त्यामध्ये टाकून त्यांच्या एस.बी.आय. खात्यामध्ये रू.११०००॑ चा भरणा वर्ग केला. त्यांनी आभार व्यक्त करणारे पत्र पठविले. पातळीवर फार तर फार आपण दोन , पाच मुलांना मदत् करू शकू परंतु जर आपणास जास्त् मुलांना मदत् करायची असेल तर आपण एखादी धर्मदाय संस्था स्थापण करून त्यामार्फत आपणास मोठया प्रमाणावर मदत करता येईल. म्हणून सन २०१० मध्ये काही निवडक मित्रांशी, ज्यांना सामाजिक जाणिव आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हेल्पिंग हॅन्ङस नावाची धर्मदाय संस्था स्थापन करावयाचे ठरविले.

शैक्षणिक कालावधीमध्ये आर्थिक अडचणींमुळे येणारी बेचैनी, अभ्यासात् लक्ष केंद्रित् करतांना येणाऱ्या अडचणी मी अनुभवलेल्या आहेत्. त्यावेळेस आपणासही कुठूनतरी मदत मिळावी असे वाटायचे. पुण्यामध्ये दीड वर्षांची सी.ए.ची आर्टिकलशीप् करतांना मित्रांकडून उसनवार करून घेतलेले रू.११००० ज्यामुळे मला पुण्यात् राहणे शक्य झाले. अन्यथा सी.ए.चा कोर्स ही मला मधूनच सोडून दयावा लागला असता. प्रयत्न करूनही बॅंकांकडून कर्ज मिळत् नव्हते. काही मॅंनेजर तर मला विचारायचे “आप् सी.ए. होंगे इसकी ग्यारंटी कौन देगा” त्यावेळेस गप्प् बसण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यामुळे ‘हेल्पिंग हॅन्ङस’ या संस्थेची आवश्यकता मला अधिकच वाटू लागली आणि २६ मार्च - २०१० ला रितसर संस्थेची धर्मदाय आयुक्त कार्यालय अ.नगर यांचेकडून नोंदणी करून घेतली.


संस्थेचा उद्देश

  1. सन २०१८-२०१९ पासुन गरजु मुले ज्यांना १२वी ला ६०% पेक्षा जास्त मार्क आहेत-पण पुढील शिक्षण शक्य नाही अशा मुलांना व्यावसायिक शिक्षण घेणेसाठी मदत करणे व स्वावलंबी बनविणे.
  2. संस्थेचा मुख्य उद्देश गरीब, होतकरू व आर्थिक दृष्टया वंचित् असणाऱ्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी मेस बील भरणे किंवा होस्टेल फी भरणे किंवा आवश्यक संदर्भ पुस्तके किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक वर्षी - रू.२०००० पर्यंतची मदत् त्यांचे उच्च शिक्षण पुर्ण - होईपर्यत करणे.
  3. त्यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणे.
  4. सदर गरजू , गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी त्यांना संवाद कौशल्य, वेगवेगळया भाषा विषयांचे ज्ञान देणे.
  5. गरीब अनाथ व्यक्तींना वैद्यकीय मदत उपचार मिळवून देणेसाठी प्रयत्न करणे
  6. गरीब होतकरू मुलासाठी वाचनालय, अभ्यासिका व वसतिगृह सुविधा सुरु करणे

संस्थेची भावीध्येय व उद्दिष्टे

Vision
  1. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व्यावसायिक घेण्यासाठी आर्थिक मदत करणे व स्वःताच्या पायावर ऊभे राहण्यासाठी मदत करणे ,
  2. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य , भाषण कौशल्य, व्यवहार कौशल्य वाढीसाठी ट्रेनिंग देणे , त्यासाठी व्याख्याने आयोजित करणे व त्यासाठीची साधन सामग्री उपलब्ध करूण देणेसाठी प्रयत्न करणे व त्यासाठीच्या पायाभून सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. डिजिटल साहित्य उपलब्ध करणे.
  3. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष कौशल्य मिळविण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग घेणेसाठी , नामवंत संस्था राज्य , राज्य किंवा देशपातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाल्यास संस्थेस शक्य असेल त्याप्रमाणे मदत करणे .
  4. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नौकरी, करीयर, व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्याने शिबिरे मेळावे यांचे आयोजन करणे .

संस्थेची यशस्वी वाटचाल

Mission

Under Construction...

वृत्तपत्र माहिती

दै.सकाळ दि.२७/१२/२००२
प्रयत्नाने वाळूचे कण…
वडिलांनी त्यांच्या वयाची ३० वर्ष पुर्ण..

Hr Line

दै.सकाळ दि. १२/०८/२०१३
उत्तम कांबळे; कोपरगावला ' हेल्पिंग हँड्स' तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे वाटप