phone९५९५३ ८३९१६, HH ९५२७६९८३९३ Devider Emailहेल्पिंगहॅन्डसकोप@जीमेल.कॉम
नोंदणी क्रमांक

महाराष्ट्र २३२/२०१०/ अ. नगर

देणगी देण्यासंबधी
अधिक माहिती

लढणार्‍यांना परिस्थिती रस्ता मोकळा करुन देते...

अधिक माहिती

banner

वृत्तपत्र माहिती

Hr Line

“दै.सकाळ” दि.२७/१२/२००२

प्रयत्नाने वाळूचे कण…

वडिलांनी त्यांच्या वयाची ३० वर्ष पुर्ण होईपर्यत मेंढपाळ व्यवसाय सांभाळला. एकत्र कुटुंबाची १९५६ मध्ये विभागणी झाल्यानंतर वडिलांना आईच्या गावी असलेली नऊ एकर शेती मिळाली आणि आमचे कुटुंब १९५६ पासून वेस (ता. कोपरगाव) येथे स्थायिक झाले. घरात् आम्ही दोन भाऊ आणि दोन बहिणी. घरात् कुणीही शिक्षण घेतलेले नाही. अशा स्थितीत माझ्या शिक्षणाला १९७१ मध्ये सुरवात् झाली. पहिलीत् मला लाभलेले शिक्षक आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यांचे नाव ओहोळ गुरूजी. पाडेगावला ( ता. श्रीरामपुर ) राहणारे. त्यांच्यामुळे शिक्षणाची गोडी लागली तरी शेवटपर्यत, गावात् प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी पोहेगावला ( ता. कोपरगाव ) रोज पाच किलोमीटर पायी जावे व यावे लागे. पायात् चप्पल नाही, थंडीच्या दिवसांत् स्वेटर नाही, पावसात् छत्री नाही. अशा स्थितीत आई-वडिल, भाऊ शेती करायचे. शेती जेमतेम पिकायची, कोरडवाहू शेती होती. अशातच मार्च - १९८१ मध्ये दिलेली दहावीची परीक्षेत ७६.७७ टक्के गुणांनी ऊत्तीर्ण झालो. पुढे शिक्षकांच्या मार्गदर्शनाने डिप्लोमा इन इंजिनिअरींगला जाण्याचा प्रयत्न केला; पण नंबर न लागल्याने, शेवटी नाईलाजाने वाणिज्य शाखेत संगमनेरला प्रवेश घेतला. तेथे समाज कल्याण खात्याचे वसतिगृह मिळाले. सरकारी शिष्यवृती मिळाली.

समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात काढलेले दिवस म्हणजे एक दिव्यच होते. बारावीचे दिवस निघून गेले. बारावीला ७४.३३ टक्के गुण मिळवून, संगमनेर केंद्रात् पहिला आलो. तोपर्यत फारशी आर्थिक अडचण नव्हती. नंतर घरची आर्थिक स्थिती खुपच ओढाताणीची झाली. शेतीही फारशी पिकेनाशी झाली; परंतु डगमगलो नाही. घरच्यांना फारसा त्रास न देता पुन्हा समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात प्रवेश घेतला व बी.कॅाम चा मार्ग सुखकर झाला. तेथे राहुन, बी.कॅाम. ७२.७७ टक्के गुणांनी ऊत्तीर्ण झालो. संगमनेर महाविद्यालयात प्रथम आलो व पुणे विद्यापीठात अकरावा आलो. घरच्यांना, शिक्षकांना आणि मित्रांना खुप् आनंद झाला.

खरी कसोटी पुढे होती. घरून महिन्याला १०० रूपये मिळणेही कठीण होते. अशातच मी सी.ए. करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात पुढील शिक्षणासाठी जायचे, मात्र आर्थिक प्रश्न बिकट होते. कुठूनही कसलीही मदत् मिळेना. निकाल लागण्यास उशीर झाल्याने, पुण्याचे समाजकल्याण खात्याचे वसतिगृह मिळाले नाही. मग संगमनेरला राहीलो. घरून एसटीने जेवणाचा डबा यायचा. एक वर्ष आर्टिकलशिप् संगमनेरलाच पुर्ण केली.पुढे पुण्याला गेलो. घरून महिना १०० रूपये कसे तरी यायचे. वडील कोपरगाव पुणे गाडीने डबा पाठवायचे. याच कालावधीत् मित्रांनी ११ हजार रूपये उसने दिले. त्यामुळे पुण्यात् राहू शकलो. क्लास पुर्ण केले. आर्टिकलशिप् संपण्यास दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असतना, पुन्हा संगमनेरला आलो. आर्थिक चिंता व इतर समस्यांनी नको ती सी.ए. ची पदवी, असे करून टाकले होते. नोव्हेंबर ८९ मध्ये पहिला ग्रुप ऊत्तीर्ण झालो. नंतरच्या कालावधीत् एका हंगामासाठी भाऊ वडिल, भावाची मुले, भावजयी ऊस तोडणीसाठी गेले होते. मी एम.कॅाम. चे क्लास घेतले. अकौंटिंगची कामे केली व आर्टिकलशिप् पुर्ण केली. सी.ए. होण्याचे स्वप्न आवाक्याबाहेर जाते, असे वाटायचे. शेवटी चुलत्यांना जून १९९१ मध्ये दोन एकर जमीन दहा हजारांना गहाण दिली व पाच वर्षानीं वीस हजार द्यायचे, या बोलीवर गहाणखत करून दिले. पैसे घेवुन, नाशिकला गेलो. तेथे दोंदे होस्टेलला राहायचो व प्.सा.नाटय मंदिराच्या अभ्यासिकेत् रोज १५ ते १६ तास अभ्यास करायचो. कुठे क्लासला गेलो नाही. सी.ए. फायनल प्री चे दोन्ही ग्रुप् प्रथम प्रयत्नात् ऊत्तीर्ण झालो. १२ जानेवारी १९९३ रोजी माझे स्वप्न पुर्ण झाले. मी सी.ए. झालो. त्याचा आनंदच काय म्हणावा ! आई-वडिलांना, मित्रांना व गावाला खुप् आनंद झाला. ज्या प्राथमिक शाळेत् शिक्षण घेतले, त्या शाळेत् गावाने माझा सत्कार केला. नंतर स्वत्:ची प्रैक्टिस कोपरगावला सुरू केली. कंपनी सेक्रेटरी प्री चे दोन ग्रुप् पुर्ण केले. फायनल प्री दयायची आहे. सर्व-सामान्य शेतकरी कुटूंबात् जन्म घेूनही, नोकरीच्या मागे न लागत प्रैक्टिस सुरू केली. आज मी समाधानी आहे. कष्टाने, जिद्दीने, चांगल्या शिक्षणामुळे व आई-वडिलांच्या आर्शीवादाने हे सारे मिळाले आहे.

helping hands helping hands helping hands helping hands helping hands helping hands helping hands helping hands helping hands

वृत्तपत्र माहिती

दै.सकाळ दि.२७/१२/२००२
प्रयत्नाने वाळूचे कण…
वडिलांनी त्यांच्या वयाची ३० वर्ष पुर्ण..

Hr Line

दै.सकाळ दि. १२/०८/२०१३
उत्तम कांबळे; कोपरगावला ' हेल्पिंग हँड्स' तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे वाटप