साधारणपणे जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयामध्ये संस्था आर्थिक मदत देण्याकरीता दैनिकामध्ये छोटी जाहिरात देऊन विद्यार्थानकडून विहित नमुण्यात अर्ज करणेसाठी अर्ज मागविते. अर्ज आलेल्या विद्यार्थ्यानकडून विहित नमुण्यातील अर्ज पाठविले जातात व त्यास आवश्यक ती कागदपत्रे जोडण्यास सांगितले जाते. विहित नमुण्यातिल अर्ज आल्यानंरत विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती उत्पनाची साधने, कमावती माणसे व मिळालेले गुण यांचा विचार करून कमिटी सदस्य विद्यार्थ्यांची निवड करतात एखाद्या अर्जदाराबद्दल शंका आल्यास त्याची गुप्त पद्धतीने चौकशी करून मगच निर्णय घेतला जातो. कुणाची ओळख किंवा वशिला यांना आजिबात थारा दिला जात नाही. हे बघितले जाते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फोन करून कळवले जाते व ऑगस्ट महिण्यात होणार्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलाविले जाते व त्यांना मदतीचे चेक अदा केले येतात. विद्यार्थ्यांचे मेरिट व आर्थिक बाजू या दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार होत असल्याने विद्यार्थ्यांनमध्ये संस्थेबद्दल आदरयुक्त भावना आहे .
मागिल १२ वर्षांमध्ये संस्थेने एकून ८१ विद्यार्थ्यांना ३६,७०,७००/- एवढ्या रकमेची मदत ऊच्चशिक्षणासाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना केलेली आहे . त्यामध्ये मागिल वर्षी ६ अंध मुलांना १२वीच्या पुढील शिक्षणासाठी मदत केली. याची यादी आम्ही सोबत तपशिलामध्ये दिलेली आहे. कुणा विद्यार्थ्याची आई धुनिभांडी काम करते , कुणाचे वडिल अपंग आहेत आई छोटीशी खासगी नौकरी करून संसाराचा भार ऊचलत आहे . कुणी मुले अर्धवेळ काम करून शिक्षण घेत आहेत . कुणाच्या वडलांचा छोटा व्यवसाय आहे . कुणाचे वडिल कोरडवाहु शेतजमिन असलेले शेतकरी आहेत , कुणाचे वडिल मरण पावलेले आहेत . कुणी निराधार , कुणाच्या घरी आई वडिल मोठ्या दुखण्याने आजारी आहेत आशा मुलांना संस्था मदत देतांना अग्रक्रम देते. पैशा अभावि कुणाही हुशार परंतु वंचित मुलांचे आयुष्य धुळीस मिळू नये म्हणून संस्था प्रयत्न करीत आहे .
संस्थेच्या कार्यकारी समितीमधील काही सदस्य प्रत्येक वर्षी रू ११०००/- ते रू २५०००/- प्रमाणे प्रत्येकी मदत करतात. बाकी मदत निधी हा संस्था समाजातील सामाजिक जानिव आसलेल्या लोकांन कडून ज्यास जसे शक्य असेल त्या प्रमाणे गोळा करते. रू ५०, १००, ५००, १००० किंवा रू ५०००/- या प्रमाणे वर्षी रक्कम देणारे दाते आहेत . कुणी स्वःताजवळ फारमोठी पुंजी नसणारे व निवृत्तीच्या पेंशनवर आयुष्य जगणारे परंतु प्रत्येक वर्षी रू १०० किंवा रू ५०० मला ऑफिसमध्ये आणुन देणारे देणगीदारही आहेत. संस्था कुणालाही देणगीसाठी आग्रह करीत नाही. त्यामुळे ज्यास जसे शक्य असेल व जितके शक्य असेल त्या प्रमाणे देणगी स्विकारली जाते. काही व्यक्ती स्वःताला शक्य नसल्यास इतरांना संस्थेची माहिती कळऊन त्यांच्या कडूनही संस्थेस मदत मिळऊन देतात. काही व्यक्तींनी आपल्या निवृत्तीनंतर मिळलेल्या रकमेतून काही रक्कम पती पत्नीच्या नावे संस्थेकडे ठेव म्हणून कायम स्वरूपी ठेवलेली आहे . त्यामधुन मिळणाऱ्या व्याजातून संस्था दरवर्षी मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत करीत असते.
संस्थेने मदत केलेले काही विद्यार्थी ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे . ते विद्यार्थीपण त्यांना मिळालेली मदत संस्थेला देणगी रूपाने त्यांना शक्य असेल त्या मार्गाने परत करीत आहेत. या संस्थेला व पर्यायाने पाठिमागून येणार्या वंचित व हुशार विद्यार्थ्यांना एक प्रकारे मदत करीत आहे .
दै.सकाळ दि.२७/१२/२००२
प्रयत्नाने वाळूचे कण…
वडिलांनी त्यांच्या वयाची ३० वर्ष पुर्ण..
मागिल १० वर्षांमध्ये संस्थेने एकून
२८,९५,०००/- एवढ्या रकमेची मदत
ईमेलपत्ता यां सारखी आपली गोपनीयता कमी करणारी व्यक्तिगत खासगी.
संस्था स्थापनेची पार्श्वभूमी सन २००६ मध्ये ऑगस्ट महिन्यात्