phone९५९५३ ८३९१६, HH ९५२७६९८३९३ Devider Emailहेल्पिंगहॅन्डसकोप@जीमेल.कॉम
नोंदणी क्रमांक

महाराष्ट्र २३२/२०१०/ अ. नगर

देणगी देण्यासंबधी
अधिक माहिती

लढणार्‍यांना परिस्थिती रस्ता मोकळा करुन देते...

अधिक माहिती

Banner

अध्यक्षांचे मनोगत

Hr Line
helping hands

सीए. दत्तात्रय बी. खेमनर
एम.कॉम., एफ.सी.ए., सीएस (इंटर)

संपूर्ण माहिती
Hr Line

आपली संस्था डोनेशन देऊन प्रवेश घेणारे विद्यार्थी, कमावते आई-वडील असणारे विद्यार्थी, उत्पन्नाचे स्त्रोत असणारे किंवा शैक्षणिक कर्ज काढुन शिक्षण पुर्ण करु शकणारे विद्यार्थी यांना मदत देत नाही. जे खुपच वंचित आहेत, ज्यांची होस्टेल फी अथवा मेस बील देणे शक्य नाही, परंतु ज्यांना मेरिटवर प्रवेश मिळालेला आाहे, ज्यांना आई-वडील नाहीत व शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही अशाच मुलांना संस्था होस्टेल फी अथवा मेस बील भरणेसाठी मदत करते. कुनाही विद्यार्थीला ट्युशन फी भरणेसाठी संस्था मदत करत नाही. कारण संस्थेला कुठल्याही प्रकारची ग्रॅंट अथवा मदत मिळत नाही. संस्था समाजातील सामाजिक जाणीव असणार्या व्यक्तींकडुन ज्यास जसे शक्य असेल त्याप्रमाणे पैसे देणगी म्हणुन गोळा करते व त्यातुन दरवर्षी ही रक्कम हुशार, वंचित, होतकरु व निराधार मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत म्हणुन होस्टेल फी अथवा मेस बील या स्वरुपात देत असते.

आपणास मदत करता येणे शक्य नसल्यास आपण समाजातील इतर सामाजिक जाणीव असणार्या व्यक्तींना संस्थेस मदत करण्यासाठी सुचवूनही संस्थेस मदत करु शकता. कारण तशा मदतीच्या हाताचेही संस्थेस अगत्य आहे. आपण आपली मदत कुणा व्यक्तिगत मुलाला देण्यासाठी सुध्दा संस्थेकडे देऊ शकता, संस्था ती मदत त्या विद्यार्थ्याकडे देण्याची व्यवस्था करेल. आपण दिलेली मदत तेथेच न थांबता सदर विद्यार्थी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ती मदत संस्थेकडे देणगी रुपाने त्यास जसे शक्य असेल त्याप्रमाने परत करेल त्यामुळे भविष्यात संस्थेस जास्त मुलांना मदत करता येईल. संस्था या वर्षापासुन निराधार आश्रमातील काही मुला-मुलींना स्वबळावरच पुढचे शिक्षण घ्यावे लागते किंवा शिक्षण बंद करुन रोजी-रोटीची लढाई सुरु करावी लागते. आापण अशा मुलांसाठी आापली देणगी वापरण्याचा किंवा आपण दिलेल्या ठेवीवरील व्याजाची रक्कम या मुलांसाठी वापरण्याची अट घालु शकता. संस्था कुणालाही देणगीसाठी आग्रह करीत नाही. कोणी किती देणगी द्यावी यालाही बंधन नाही. स्वकष्टाचे रु. ५०/- किंवा रु. १००/- देणगी देणारे दाते जसे आहेत त्याप्रमाणे जास्तीच्या कामासाठी योग्य वापर होईल याचा आम्ही तुम्हाला मागील पाच वर्षांमध्ये विश्वास दिलेलाच आहे. तुमच्याकडे असताना देणे श्रेष्ठच, पण तुमच्याकडे खुप काही नसताना देणे श्रेष्ठतमः द्यायचे प्रसंग अनेक….., मुलांचे वाढदिवस, आई-वडीलांचा वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, घरातील गत जेष्ठांचा तिथी, लग्नाची पंचवीशी, पन्नशी असे एक-ना-अनेक कवी दत्ता हलसगीकरांनी त्यांच्या कवितेमध्ये म्हटलेच आहे.

“ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी,
ज्यांच्या अंगणात ढग जमुन आले, त्यांनी आोंजळभर पाणी द्यावे.”

वृत्तपत्र माहिती

दै.सकाळ दि.२७/१२/२००२
प्रयत्नाने वाळूचे कण…
वडिलांनी त्यांच्या वयाची ३० वर्ष पुर्ण..

Hr Line

दै.सकाळ दि. १२/०८/२०१३
उत्तम कांबळे; कोपरगावला ' हेल्पिंग हँड्स' तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे वाटप